आधुनिक उपकरणासाठी प्रसिद्ध असणा-या इस्राइलच्या लष्कराच्या सुपर युएव्हीचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. गुप्त मोहिमेसाठी लष्कराचे हे सर्वात महत्त्वाचे वाहन आहे. मानविरहीत या वाहनाचे नाव एयरमुल यूएव्ही आहे. अर्बन एयरोनॉटिक्सने कार्गो ट्रांसपोर्ट, वैद्यकीय मदत आणि रात्रीच्या वेळी सैनिकांना आघाडीवर पाठवण्यासाठी हे वाहन डिझाइन केले आहे.
हे वाहन 500 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते. यामुळेच लष्कराचे अधिकारी याला 'फ्लाइंग डंकी' म्हणतात. व्हर्टिकल टेकऑफ आणि लॉँडिंग करणारे हे वाहन 2008मध्ये समोर आले होते. 2010मध्ये याच्या चाचण्या करण्यात आल्या. आता याचा लष्करी ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. यूएव्ही 185 किमी प्रती तासाच्या गतीने 3,657 मीटर उंच उडू शकते.
पुढील स्लाइडसवर पाहा यूएव्हीचे फोटो...