आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israeli Election Prime Minister Benjamin Netanyahu

इस्त्रायलमध्ये पुन्हा नेतन्याहू?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम - इस्रायलमध्ये मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी लिकूड-बैटेनू आघाडीला पुन्हा सत्ता मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हाती पुन्हा देशाची सूत्रे येतील. निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील निकाल मध्यरात्री उशिरा जाहीर होऊ शकतो. त्यानंतर नवीन सरकारची स्थापना होण्यास मात्र अनेक आठवडे जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी पश्चिम जेरूसलेममध्ये नागरिकांनी आपला हक्क बजावण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. अंतिम निर्णय बुधवारी सकाळी जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी पॅलेस्टाइन किंवा शांततेच्या मुद्द्यावर काहीही ठोस आश्वासन दिले नाही. केवळ सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरच प्रचार काळात भर देण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.


निवडणुकीवर एक नजर
120 जागा, 35 पक्ष, 5, 65, 65705 मतदार, 10 : 30 पासून रात्री दीड वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार) मतदान चालले.