आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israeli Fighter Jets Strike Dozens Of Targets In Gaza, Divya Marathi

इस्रायलच्या हल्ल्यात गाझावरील एकमेव विद्युत केंद्र नष्‍ट, PIX मध्ये पाहा सद्य:स्थिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा/जेरूसलम - इस्रायलच्या हल्ल्यात बुधवारी( ता. 23) गाझापट्रटीचे एकमेव विद्युत केंद्र नष्‍ट झाले. यात हमासची क्षेपणास्त्रे असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या संघर्षात 630 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. दरम्यान मंगळवारी (ता. 22) झालेल्या हल्ल्यात एक मुलगा, इस्रायलचे 28 सैनिक आणि 2 नागरिक मारले गेले. हवाई हल्ल्याबाबत इस्रायलला हमासकडून जबरदस्त उत्तर मिळत आहे.
विमान सेवा पूर्णपणे बंद
अमेरिकेची डेल्टा एअरलाइन्स, अमेरिकी एअरलाइन्स ग्रुप आणि युनायटेड एअयलाइन्सने बुधवारी इस्रायलकडे जाणा-या विमानांची सेवा थांबवली आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्‍ट्रेशनने गाझापट्टीमध्‍ये इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्‍ये वाढत चाललेल्या तीव्र संघर्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी विमानसेवा देणा-या कंपन्यांना आदेश दिला आहे. युरोप‍ियन कॅरिअर, जर्मनी लुफ्तान्सा, एअर फ्रान्स आणि हॉलंडची केएलएम विमानसेवा थांबवल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला.

पुढील स्लाइड्सवर पाहा इस्रायल हल्ल्यानंतरची गाझापट्टीवरील ताजी क्षणचित्रे....