आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israeli Fire Killed At Least 21 Palestinians In Gaza, Divya Marathi

इस्रायलने गाझापट्टीवर हवाई हल्ले केले तीव्र, हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरूसलेम/गाझा - इस्रायलने बुधवारी ( ता. 30) केलेल्या हवाई हल्ल्यात 21 जण मारली गेली. यात हमासची अनेक ठिकाणे लक्ष्‍य करण्‍यात आले, असे इस्रायलने म्हटले आहे. मागील 23 दिवसांपासून चालू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षात 1 हजार 200 लोकांचा बळी गेला आहे, तर 6 हजार 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. 8 जुलैपासून इस्रायलने गाझापट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहे. गाझाकडून होत असलेले क्षेपणास्त्र हल्ले रोखणे आणि हमासची बोगदे नष्‍ट करणे हा इस्रायलच्या हल्ल्यामागे उद्देश आहे.

शस्त्रसंधीची शक्यता
इजिप्तने इस्रायल-हमासमध्‍ये शस्त्रसंधीचा प्रस्ताव मांडला आहे. या दिशेने पावले टाकली जातील,असे इस्रायली माध्‍यमात चर्चा सुरू आहे. पॅलेस्टाइन राष्‍ट्राध्‍यक्ष मेहमूद अब्बास हमासचे प्रमुख खालेद यांच्या संपर्कात आहेत, असे म्हटले जात आहे.

पुढे पाहा...इस्रायल आणि गाझाची ताजी छायाचित्रे....