गाझा पट्टीमध्ये संयुक्त राष्ट्राव्दारे चालवण्यात येत असलेल्या एका शाळेवर
इस्रायल लष्कराने केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 18 दिवसांपासून चालू असलेल्या भीषण संघर्षात आतापर्यंत 796 पॅलेस्टाइनी मृत्युमुखी पडले आहेत.
यूनायटेड नेशन्स सेकेटरी जनरल बान की मून यांनी उत्तर गाजापट्टीच्या बेत हेनोनमधील परिसरातील शाळेवर झालेल्या रॉकेट हल्ल्याविषयी दु:ख व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रानुसार, या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महिला आणि मुले सामील आहेत. बान की मून यांनी हल्ल्यासंबंधित सादर केलेल्या स्टेसमेंटमध्ये सांगितले, 'परिस्थिती अद्याप स्पष्ट नाहीये. मी इस्रायलच्या या कृत्याची कडक निंदा करतो.'
इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टिनेंट कर्नल पीटर लर्नर यांनी या घटनेवर रॉयटर्सला सांगितले, 'गाझा पट्टीमध्ये हमास दहशतवाद्यांवर इस्रायलचे सैनिक रॉकेट हल्ला करत आहेत. यावेळी ही शाळा रॉकेटचा निशाणा झाली असावी. परंतु आम्हाला अद्याप यावर विश्वास नाहीये. आम्ही चौकशी करत आहोत.'
घटनास्थळी उपस्थित रॉयटर्स छायाचित्रकारानुसार, रॉकेट हल्ल्यानंतर शाळेच्या फरशीवर आणि मुलांच्या बाकांवर रक्ताचा सडा सांडला होता.
सुरक्षित राहण्यासाठी शाळेत लपलेले अनेक कुटुंब इस्रायल हल्ल्याचे शिकार बनले आहे. हल्ल्यानंतर रडणारे, खचून गेलेले लोक जखमी मुलांना दवाखान्यात घेऊन जाताना दिसले. हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित पॅलेस्टाइन महिला लैला शिनबरी यांनी सांगितले, 'आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी लपलो होतो. त्याचवेळी एक रॉकेट आमच्या डोक्यावरून सरळ शाळेच्या छतावर जाऊन धडकले. काही वेळात सर्वत्र रक्त आणि मृतदेह दिसले. लोकांचा अाक्रोश ऐकायला येऊ लागला. या घटनेत माझ्या मुलीचा मृत्यू झाला असून सर्व नातेवाईक गंभीर जखमी आहेत.'
गाझा हेल्थ मिनिस्ट्रीचे प्रवक्ते अशरफ अल-किदरा यांनी सांगितले, की इस्रायल रॉकेट हल्ल्यात जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला असून 200पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी आहेत.
लाखो लोक निर्वासित घरांमध्ये
गेल्या 18 दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्लाईन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात 140,000 पेक्षा जास्त पॅलेस्टाइन नागरिकांना राहते घर सोडावे लागले. जास्तित जास्त नागरिकांनी 'यूनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजेंसी' (UNRWA)च्या निर्वासित शिबिरांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
UNRWAचे प्रवक्ते क्रिस गुनीस यांनी सांगितले, 'या संघर्षाची किंमत नागरिकांना चुकवावी लागत आहे. परिस्थिती खूपच गंभीर आणि नाजूक झाली आहे.'
पुढील स्लाइड्सवर पाहा हल्ल्यानंतरची परिस्थिती...