आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्त लष्कराकडून गाझातील 13 बोगदे नष्ट, 14 अतिरेकी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो / गाझा - इजिप्तच्या लष्कराने रविवारी केलेल्या कारवाईत सिनाई ते गाझापट्टीतील हमासचे 13 बोगदे नष्ट करण्यात आले. मोहंमद मुर्सी यांना सत्तेवरून हटवण्यात आल्यानंतर गेल्या वर्षीपासून देशात सातत्याने हिंसाचार सुरू आहे. सिनाई भागातील धाडीत 14 जण ठार तर 47 जणांना अटक करण्यात आली.
पॅलेस्टाइनचा दहशतवादी गट हमासचे गाझा भागात वर्चस्व आहे. गाझापट्टीत संघटनेच्या कारवाया अशा बोगद्यांतून केल्या जात असल्याने इजिप्तची डोकेदुखी वाढली होती. देशांतर्गत बंडखोरी आणि दहशतवाद्यांच्या कारवाया यामुळे चिंता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर इजिप्त लष्कराने ही कारवाई केली. बोगद्याचा वापर शस्त्रांची तस्करी, अन्नपदार्थ, पैसे दडवणे इत्यादी गोष्टींसाठी केला जातो. ही रसद तोडण्यासाठी इजिप्तने ही कारवाई केली. या बोगद्यातून हमासने इस्रायलवर हल्लेदेखील केले होते. दुसरीकडे इजिप्तने पूर्वेकडील सिनाई भागात टाकलेल्या धाडीत अनेक संशयितांना अटक झाली. त्या वेळी धुमश्चक्री उडाली. त्यात 14 जण ठार झाले.
हमासकडून नकार : इस्रायलने रविवारी पुन्हा नागरिकांसाठी मानवतेच्या पातळीवर युद्धबंदीची मर्यादा 24 तासांसाठी वाढवली होती. परंतु हमासने त्याला नकार दिला. गाझामधून इस्रायलचे रणगाडे परतत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची युद्धबंदी होऊ शकणार नसल्याचे हमासने म्हटले आहे. वीस दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात 1 हजार 50 पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अखेर इस्त्रायलने हल्ले सुरू करणार असल्याचे संकेत दिले.
भारतीय जवान शहीद
गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात एका भारतीय वंशाचा एक जवान शहीद झाला. बराक राफेल देगॉरकर (27) असे भारतीय वंशाच्या सैनिकाचे नाव आहे. शनिवारी रात्री झालेल्या तोफ गोळ्याच्या हल्ल्यात देगॉरकर मृत्युमुखी पडले.