आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel\'s Offensive Against Gaza Left 2,000 Palestinian Orphan

गाझा पट्टी: 2,000 बालके झाली अनाथ; पाहा सद्य:स्थिती दाखवणारे PHOTOS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: अल मुगरागामध्ये पडलेल्या घराजवळ कॉफी बनवणारी महिला, जवळच मुलगा उभा
गाझा - जवळच्या लोकांना गमावण्याचे दुःख काय असते याचा अनुभव गाझाच्या लोकांशिवाय दुसरे कोणीच चांगल्या प्रकारे सांगू शकणार नाही. प्रत्येक सकाळी त्यांच्या जखमा ताज्या होऊन त्यांच्या हृदयावर घाव घालतात. पॅलेस्टिन सामाजिक प्रकरणातील मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकड्यांनुसार इस्त्रायलमध्ये आतापर्यंत जवळपास 2,000 मुले अनाथ झाली आहेत. अधिकारी एतिमद अल तरशावी म्हणाले की, यामधील अनेकांना आई अथवा वडील, तर काहींनी दोघांनाही गमावले आहे.

तशरावी म्हणासले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात अनाथ मुलांच्या खानपानाची व्यवस्था करणे हे पॅलेस्टीन अधिकार्‍यांना अवघड जात आहे. इस्त्रायल-हमास यांच्या दरम्यान 51 दिवस चाललेल्या युध्दात जवळपास 2,152 पॅलेस्टीनचे नागरिक मारले गेले, तर 11,000 जखमी झाले. यामधील अनेक तर साधारण नागरिक होते.
या विध्वंसक युध्दात शेकडो घरे जमिनदोस्त झाली. त्यामुळे अनेकांना राहण्यास हक्काचे घरही नाही. मिळालेल्या अहवालांनुसार, 63,000 पेक्षा अधिक पॅलेस्टीनी लोकांना शाळांमध्ये राहावे लागले. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाच्या अहवालानुसार, जवळपास 50,000 लोक आपल्या नातेवाईकांकडे राहात आहेत.
पुढील फोटोंमध्ये पाहा, गाझाची सद्य परिस्थिती...