आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isral Found Terrorist Tunnel, Hamas Terrorist Used This For Attcking

इस्रायलने शोधला दहशतवादी बोगदा, हमास अतिरेकी करत होते हल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम - इस्रायलने पॅलेस्टीन भागातून इस्रायलमध्ये येणारा बोगदा शोधून काढल्याचा दावा केला आहे. इस्रायलने त्यास दहशतवादी बोगदा संबोधले आहे. या बोगद्यातून हमास अतिरेकी इस्रायली नागरिकांवर दहशतवादी हल्ला करत होते तसेच त्यांच्याकडून ज्यू नागरिकांचे अपहरण केले जात होते, असे इस्रायलने म्हटले आहे.

दरम्यान, बोगदा खोदल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. इस्रायलला एखादी गोष्ट वाढवून सांगण्याची सवयच आहे, गाझातील सत्तारूढ हमासने सांगितले. इस्रायली रेडिओच्या वृत्तानुसार, बोगदा न्यूयॉर्कच्या उपनगरीय रस्त्याप्रमाणे आहेत. याबरोबर इस्रायलने गाझा पट्टीकडे जाणारी सर्व सामग्री रोखली आहे. बोगद्यात स्फोटके आढळल्याचे लष्कराने सांगितले. बोगदा 15 ते 18 मीटर खोल असून साधारण 500 टन सिमेंटचा त्यासाठी वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते.