आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रोम - भारतीय मच्छिमार हत्या प्रकरणात आरोपी खलाशांना भारतात पाठवण्याच्या निर्णयावरून सरकारवर टीका होत असतानाच मंगळवारी इटलीचे परराष्ट्र मंत्री ग्युलिओ तेर्झी यांना राजीनामा द्यावा लागला.
संसदेत तेर्झी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. दोन खलाशांना भारतात खटल्याच्या सुनावणीसाठी पाठवण्यात आल्यामुळे देशभरात वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात घेण्यात आलेला निर्णय आता कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाही, असे 66 वर्षीय तेर्झी यांनी सांगितले. 22 मार्च रोजी इटलीचे हे खलाशी भारताला परतले आहेत, परंतु त्यांना कदापि फाशीची शिक्षा होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खटल्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली. या खटल्यात भारत-इटली यांच्यात कसलाही समझोता झालेला नाही. खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा होईल, असे निश्चित नाही, असे सरकारने कळवल्याचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितले.
अकरा दिवसांचा वाद
भारत आणि इटलीमध्ये मच्छिमार हत्येप्रकरणात संबंध ताणले गेले होते. इटलीने पॅरोलवरील खलाशांना परत पाठवणार नसल्याचा खलिता पाठवला होता. त्यावरून उभय देशांत 11 दिवस राजनैतिक संबंध ताणले गेले होते. या प्रकरणात भारताने कडक भूमिका घेतल्यानंतर इटलीने यू-टर्न घेत खलाशांना भारतात पाठवले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.