आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Italian Nurse Kills 38 Patients, Takes Selfies With Their Corpses Divyamarathi.com News

इटलीच्या नर्सवर 38 पेशंटची हत्या, मृतदेहांसोबत SELFIE घेण्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम - इटलीच्या एका नर्सवर 38 रुग्णांना विष देऊन मारल्याचा आणि त्यांच्या मृतदेहांसोबत स्वतःच्या मोबाइल फोनने सेल्फी घेण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. डेनिला पोगियाली असे त्या नर्सचे नाव आहे. तिने रुग्णांची हत्या फक्त ते तिला त्रास देत होते, या कारणामुळे केल्याची चर्चा आहे. हॉस्पिटलच्या स्टाफचे म्हणणे आहे, की डेनिला ही एक पाषाणह्रदयी स्त्री आहे. तिच्या शिफ्टमध्ये जे रुग्ण तिला त्रास देत ती त्यांचा काटा काढत होती.
विषारी इंजेक्शन देत होती
डेनिलाला 78 वर्षांच्या रोजा काल्देरोनी या वृद्धेच्या हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस तपासात तिच्या शिफ्ट दरम्यान मृत्यू झालेल्या इतर 37 रुग्णांच्या मृत्यूचे गुढ उकलले गेले. न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, जे रुग्ण, त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या भेटीसाठी आलेले लोक डेनिलाला त्रास देत होते, ती त्या रुग्णांना पोटॅशियम क्लोराइडचे इंजेक्शन देऊन ठार मारत होती.
रोजा यांना नियमीत तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असताना डेनिलाच्या शिफ्टमध्ये त्यांचा अचानक मृत्यू झाला होता.
मृतदेहांसोबत घेत होती सेल्फी
डेनिलाचे सहकारी सांगतात, की ती कठोर काळजाची स्त्री आहे. जे रुग्ण तिला त्रास देत ती त्यांच्यावर सुड उगवत होती. म्हणजे, ती त्यांना शांत राहाण्यासाठी असे औषध किंवा इंजेक्शन देत होती, की ते शांतच राहिले पाहिजे. त्याचा त्रास पुढच्या शिफ्टला येणार्‍या नर्सला होत होता. रुग्णांना मारल्यानंतर ती लगेच त्यांच्या मृतदेहासोबत स्वतःच्या मोबाइलने सेल्फी घेत होती. पोलिसांनी तिचा मोबाइल जप्त केला असून त्यात एका मृतदेहासोबत ती आंगठा दाखवतानाचा फोटो आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डेनिलाची छायाचित्र...