आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीचे दोन्ही नौसैनिक आज भारतात; भारतीय मच्छीमारांच्या हत्येचा आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- भारताच्या कठोर भूमिकेपुढे झुकत इटली सरकारने भारतीय मच्छीमारांच्या हत्येतील आरोपी दोन्ही नौसैनिकांना पाठवण्याची तयारी गुरुवारी दाखवली. शुक्रवारी हे दोघे दिल्लीस पोहोचणे अपेक्षित आहे.

दोन्ही नौसैनिकांना 22 मार्चपर्यंत हजर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. इटलीचे राजदूत डॅनियल मेनिसन यांच्या लेखी हमीवर दोघांना मतदानासाठी चार आठवडे मायदेशी जाण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु गेल्या आठवड्यात दोघांना परत पाठवण्यास इटलीने नकार दिला. त्यावर भारताने इटलीला सुनावले होते. सुप्रीम कोर्टाने मेनिसन यांना देश सोडण्यास मनाई केली होती.