आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jackie Chan`s Son Arrested In China For Drugs Possession

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सुपरस्टार जॅकी चैनच्या मुलाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- सुपरस्टार जॅकी चैनचा 32 वर्षीय मुलगा आणि सिने अभिनेता जॅसी चैन याला चीनी पोलिसांनी अटक केली आहे. जॅसी आणि त्याच्या एका मित्रावर अमली पदार्थ बागळल्याचा आरोप आहे. एका सरकारी वृत्तसंस्थेने आज (सोमवार) ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जॅसी चैन आणि त्याचा मित्र चेन तुंग याला पोलिसांनी अटक केली आहे. जॅसी स्वत: सिने अभिनेता आहे. फांग ज्यूमिंग या नावाने तो प्रसिद्ध आहे. जॅसी आणि चेनला कधी अटक झाली, हे मात्र समजू शकले नाही. चीनी सोशल मीडिया साइट 'व्हायबो'वर जॅसी खूप अॅक्टिव्ह आहे. गेल्या मंगळवारपासून त्याने एकही पोस्ट टाकलेली नाही.
'बीजिंग न्यूज'च्या अहवालानुसार जॅसी आणि चेन मागील दोन वर्षांपासून चीनमध्ये अमली पदार्थ बाळगत होते. पोलिसांनी त्याला दोघांना रंगेहात अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.