आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jamesh Folly News In Marathi, Divya Marathi, Twitter

अमेरिकी पत्रकारावरील अत्याचाराची छायाचित्रे आता ट्विटरवरून बाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरने असा निर्णय घेतला आहे की, ते अमेरिकी पत्रकार जेम्स फॉलेची ती छायाचित्रे आता दाखवणार नाहीत, ज्यात इराकच्या इसिस दहशतवाद्यांनी त्यांच्याबरोबर वाईट वागणूक दिलेली आहे. अशातच काही दिवसांत ट्विटरवर जेम्सच्या जीवनातील शेवटच्या क्षणातील छायाचित्रे जास्त शेअर केली जात होती. याची माहिती होताच ट्विटरचे सीइओ डिक कोस्तोलो यांनी स्वतहा ट्विट करुन अशी माहिती दिली की, आम्ही अशा कोणत्याही युजरला जेम्सच्या अंतमि क्षणाची छायाचित्रे शेअर करण्याची परवानगी देणार नाही. जर कोणी युजर असे करत असेल तर अशा युजरला त्याचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. ट्विटरने हेही सांगितले आहे की, आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत आणि असे कोणतही कार्य आम्ही करणार नाही, ज्यात ह‍िंसा करणा-या संघटनांना प्रोत्साहन मिळेल.
ट्विटरच्या वतीने हा संदेश जारी केल्यावर त्याचा लगेचच परिणाम दिसू लागला. त्या तथाकथति युजर्सनी न केवळ ती जेम्सची छायाचित्रे वगळली, एवढेच नव्हे तर त्या घटनेबद्दल सहानुभूती दाखविणे सुरू केले. ट्विटरने हे पाऊल यासाठी उचलले की, ट्विटरवर असेही बरेचसे लोक होते की, ज्यांनी सोशल मीडिया कंपनीला दहशतवादी संघटना इसिसचे उपद्व्याप हटवण्याचे अपील केले होते.

न्यूयॉर्क पोस्टचे मुखपृष्ठ चर्चेत
न्यूयॉर्क पोस्टने आपल्या कव्हर पेजवर जेम्सचे फोटो लावले आणि जेम्सला असाधारण मुलगा, असे म्हटले आहे. यावर ट्विटरवर चर्चा झडल्या की काय ट्विटर वृत्तपत्राचेही अकाउंट बंद करणार काय? यानंतर न्यूयॉर्क पोस्ट वृत्तपत्राविषयी लिहिले की, आम्ही त्यांचे म्हणजे न्यूयॉर्क पोस्टचे अकाउंट बंद करणार नाही. कारण या वृत्तपत्राने जेम्सला वेगळ्या पद्धतीने दाखविले आहे. तिकडे फेसबुकवर जेम्सची आई डायनी यांनी आपल्या मुलाबाबत एक फारच भावुक संदेश लिहिला आहे की, माझा मुलगा एक असाधारण माणूस पत्रकार आणि श्रेष्ठ व्यक्तमित्व असलेला असा होता. त्याने त्याची व आपल्या कुटुंबीयांची प्रायव्हसी (खासगीपण) कायम ठेवण्यास सांगितले आहे. म्हणजे आपल्या हौतात्म्याचे कुठलही भांडवल करू नये असे सांगितल आहे. जेम्सच्या आईने पुढे असही लिहिले आहे. माझा मुलगा स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झाला.

huffingtonpost.com