स्टील, सिमेंटचा वापर करून शहरांमध्ये काँक्रीटची जंगले उभी करण्याचे दिवस आता सरलेत. त्याऐवजी नैसर्गिक, साधी घरे यांना यापुढे प्राधान्य दिले जाईल असे काही जपानी वास्तुविशारदांना वाटते. त्यापैकीच एक आहेत प्रिट्झकर पुरस्कार विजेते केंगो कुमा. त्यांनी टोकियोत लाकूड, कागदाचा वापर करून काही देखण्या व टिकाऊ इमारती उभ्या केल्या आहेत.
इमारतींची वैशिष्ट्ये
परंपरागत जपानी टी पद्धतीची घरांची शैली. बांबू, कागदासारख्या नैसर्गिक वस्तूंचा वापर यात केला जातो. इमारतीची दारे, खिडक्या, फर्निचर अगदी सगळीकडे बांबूचा वापर केला जातो.
(फोटो : टोकियोच्या सनी हिल्स परिसरातील ‘पायनॅपल हाऊस’)
पुढे पाहा, बांबू, कागदाचा वापर करण्यात आलेली नेझू संग्रहालयाची ही इमारत