आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Japan Assures India To Cooperate In Running Bullet Train During Modi Abe Talk

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी गुजराती, माझ्या नसानसात व्यापार, जपान दौर्‍यात मोदींचे मनोगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी तेथील उद्योजक व व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले. सर्वांना आपल्या कौशल्याचा विश्वास देत मोदी म्हणाले, मी गुजराती आहे आणि व्यावसायिकता माझ्या नसानसात भिनलेली आहे.
मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंित्रपदी असतानाच्या आपल्या कामाची आठवणही जपानी उद्योजकांना करून दिली. ते म्हणाले, जर गुजरातचा अनुभव हा मापदंड असेल तर संपूर्ण भारतातही त्यांना तशीच प्रतिक्रिया आणि वेग मिळेल. यासोबतच भारत आिण जपानने पाच मोठ्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्याला प्रतिसाद म्हणून जपानने भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवण्याची घोषणा केली. जपानने भारताकडे गंगा स्वच्छता, संरक्षण आणि बुलेट ट्रेनसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला. तसेच येत्या पाच वर्षंात २.१० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा भरवसाही दिला आहे. या पार्श्वभूमीवर जपानी उद्योजकांना सवलती देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात "जपान प्लस' समितीची स्थापना केली जाणार आहे.

अणुकरार मात्र झाला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अाबे यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही उभय देशांत अणुकरार होऊ शकलेला नाही. दोन्ही देशांनी याबाबत सुरू असलेल्या चर्चेला लवकरच मूर्तरूप देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. जपानी कौशल्याने प्रभावित झालेल्या मोदींनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधान कार्यालयात जपानी कायझेन सिस्टिम ऑफ मॅनेजमंेट लागू केली आहे.
जपानमध्ये मोदींनी कोलांटउडी का घेतली?
चीनचा भारत आणि जपानसोबत सीमेवरून वाद आहे. चीन-जपानचे काही बेटांवरून भांडण आहे. भारतात लडाखमधील काही भाग व अरुणाचल प्रदेशावर चीन दावा सांगत असतो. चीन लष्कराने भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली आहे.

जपानच्या दौऱ्याआधी मोदी म्हणाले होते...
"चीन भारताचा सर्वात मोठा शेजारी आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात चीनचे मोठे स्थान आहे. भारत, जपान आणि चीन यांनी एकत्र येऊन २१ व्या शतकाला आशियाचे शतक बनवायला हवे.'

विस्तारवादाने नव्हे, विकासवादाने २१व्या शतकाची उभारणी
मोदींनी नाव न घेता चीनला चांगलाच टोला लगावला. म्हणाले, आम्हाला चोहोबाजूंनी विस्तारवादाचे चित्र दिसते. कुणी कुणाच्या समुद्रात घुसखाेरी करत आहे, तर कुणी सीमेवर अतिक्रमण. यामुळे कुणाचेच भले होऊ शकत नाही. २१ व्या शतकात भारत-जपानला जगाचे नेतृत्व करायचे असेल तर विकासवादाचाच मार्ग अवलंबावा लागेल. कारण या दोन्ही देशांचा विकासवादावरच विश्वास आहे. शांतता आणि प्रगतीची हमीही घेता येऊ शकते.

वक्तव्यातील महत्त्वाचा बाबी
रोजगारासाठी :
भारतीय तरुणांना जपानच्या कारागिरांसारखे कौशल्यवान बनवायचे आहे. २०२० मध्ये भारत जगाला कौशल्यवान श्रमबळाचा पुरवठा करेल.
गुंतवणुकीबाबत :
येत्या पाच वर्षांत जपान भारतात थेट प्रत्यक्ष गुंतवणूक दुपटीवर नेईल. म्हणजेच २.१० लाख कोटी रुपयांची गंुतवणूक.
गुंतवणूकदारांना सुविधा :
पीएमओ जपानमध्ये प्लस स्पेशल मॅनेजमेंट टीम बनवेल. यात जपानी उद्योजक दोन जणांना नामांकित करतील, तर दोघे भारतीय डिसिजन मेकिंग टीमचे सदस्य असतील.
परस्पर संबंध :
२१ वे शतक कसे असावे, हे भारत-जपान ठरवतील. भारताच्या विकासात जपानची भूमिका असेल. आध्यात्मिक व सांस्कृतिक संबंधांना नव्या पातळीवर नेले जाईल.