आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan Plans Bullet Train With Top Speed Of 600 Kmph

इथे लागली वेगाची शर्यत, या आहेत जगातील फास्‍टेस्‍ट ट्रेन्‍स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरफास्‍ट बुलेट ट्रेन जगात सर्वप्रथम सुरु करणा-या जपानने आणखी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. जपानमध्‍ये ताशी 350 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन्‍स धावतात. मात्र, आता ताशी 600 किलोमीटर वेगाने धावणा-या सुपर बुलेट ट्रेन्‍सची निर्मिती करण्‍यात येणार आहे. चुंबकीय शक्तीद्वारे या ट्रेन्‍स धावतील. जपानच्‍या केंद्रीय रेल्‍वे कंपनीने या योजनेची माहिती दिली. पुढील वर्षापासून त्‍यावर काम सुरु होणार असून 2027 पर्यंत ते पूर्ण करण्‍यात येईल.

जपानने यापूर्वीच चुंबकीय शक्तीवर धावणा-या मॅग्‍लेव्‍ह ट्रेनची निर्मिती सुरु केली आहे. मात्र, आता त्‍रूांची गती वाढविण्‍यात येणार आहे. टोकियो आणि नागोया या दरम्‍यान पहिल्‍या प्रवासी रेल्‍वेमार्गची सुरुवात होण्‍याची अपेक्षा आहे. हे अंतर सुमारे 286 किलोमीटर एवढे आहे. सध्‍याच्‍या बुलेट ट्रेन्‍स ते दिड तासांमध्‍ये गाठतात. मात्र, नवी बुलेट ट्रेन केवळ 40 मिनिटांमध्‍येच हे अंतर पूर्ण करेल.

नविन टेन्‍समध्‍ये अतिशय शक्तीशाली मोटर्स वापरण्‍यात येणार आहे. त्‍यातून शक्तीशाली चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल. रेल्‍वे रुळांच्‍या 10 सेंटीमीटर उंचीवरुन ट्रेन धावेल.

जपानशिवाय आणखी काही देशांनी बुलेट ट्रेन्‍सची निर्मिती केली. त्‍यात फ्रान्‍स आणि चीनसारख्‍या देशांचा समावेश आहे. या गाड्यांचा एवढा प्रचंड वेग आहे, की रुळांच्‍या बाजुला उभी असलेली वा-याच्‍या वेगाने व्‍यक्ती उडून जाईल. या गाड्यांविषयी माहिती जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...