आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना रात्री मोबाइल वापरावर बंदी; जपान सरकारचा फतवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- शाळकरी विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा होणारा अतिरेक थांबविण्यासाठी जापान सरकारने एक फतवा काढला आहे. जापान सरकारने टोकियो शहरात रात्री नऊनंतर विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरण्यावर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे ही बंदी कायदेशीन नसली तरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी याची अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे.

जापान सरकारने जाहीर केलेल्या फसव्यानुसार, ही बंदी एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे रात्री नऊ वाजता शहरातील सगळ्या पालकांना आपल्या पाल्याचा मोबाईल ताब्यात द्यावा लागणार आहे.

टोकियो शहरातील बहुतेक शाळांनी जापानी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना मोबाइलपासून परावृत्त करण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे आहे.