आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 हजार किलोची ट्रेन, 8 मिनिटे प्रयत्न आणि महिला सुखरूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - आपलेच वाहन ढकलताना लोकांना कैक वेळा बघितले असेल, परंतु जपानमध्ये प्रवाशांनी चक्क रेल्वेलाच धक्का दिला. त्याचे झाले असे की, सोमवारी सकाळी तीसवर्षीय महिला मिनामी उरावा स्थानकावर रेल्वेगाडी आणि प्लॅटफार्ममधील चिंचोळय़ा जागेतून रूळावर पडली. प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी रेल्वेच्या जवळपास 32 हजार किलो वजनाच्या डब्याला जोरदार धक्का दिला. एका बाजूला तो काहीसा झुकला आणि महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले. आठ मिनिटे उशिराने रेल्वेगाडी तेथून रवाना झाली.