इंटरनॅशनल डेस्क - कॉरमॉरेंट्स ( शिकारी पक्षी ) हा समुद्री पक्षी आहे. त्याचे मुख्य आहार मासे असतात. माशांचा शिकार करण्यात ते पारंगत आहेत. चीन आणि जपानमध्ये या पक्ष्यांच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. जपानमध्ये या पारंपरिक कलेला 'कॉरमॉरेंट्स फिशिंग' म्हटले जाते. आजही ती जपानमध्ये चालू आहे. या मासेमारी पध्दतीला 1 हजार 300 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत.
कॉरमॉरेंट्स मासेमारीला पहाटे सुरूवात होते. रात्री कॉरमॉरेंट्स पक्ष्यांना नदीवर नेले जाते आणि त्यांच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. तत्पूर्वी मच्छीमार नदीत जळत्या लाकडाने प्रकाश निर्माण करतात. नंतर ती माशांना पकडण्यासाठी कॉरमॉरेंट्सला मजबूत अशा दो-यांनी बांधतात. यामुळे मासेमारी करण्यास सोपे जाते. कॉरमॉरेंट्सची चोच खूप मोठी असल्याने मासे सहज पकडली जातात. दरम्यान मच्छीमार मासेमारीसाठी कॉमॉरेंट्सची निवड करित असतात.
पुढील छायाचित्रांमध्ये पाहा जपानच्या पारंपरिक अशी मासेमारीची पध्दत......