आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Japanese PM Shinzo Abe Defends Handling Of Hostage Crisis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्य देशांत सैन्य पाठवायचा हक्क असावा : शिंजो अ‍ॅबे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी जपानी पत्रकाराचा शिरच्छेद केल्यानंतर जपानमध्ये संतप्त भावना आहेत. स्वत: पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली असून प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी जगातील कुठल्याही भागांत सैन्य पाठविण्याचा हक्क असला पाहिजे, असे अ‍ॅबे यांनी म्हटले आहे.

या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून यावी, मागणी त्यांनी केली आहे. इस्लामिक स्टेटने आेलिस ठेवलेल्या जपानी पत्रकाराचा शिरच्छेद केल्याचे जाहीर केले आहे. केंजी गोटो या पत्रकाराची आयएसच्या तावडीतून सुटका करण्याचे जपानी सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरले. दहशतवाद्यांनी त्याचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर जपानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वी अन्य एका जपानीची हत्या केली.