आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Japanese Researchers Develop 30 minute Ebola Test, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानच्या संशोधकांनी 30 मिनिटांची इबोला चाचणी केली विकसित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - इबोला संसर्ग झाला की नाही हे आता 30 मिन‍िटांमध्‍ये कळले. जपानच्या संशोधकांनी एक नवीन पध्‍दत शोधली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला इबोला संसर्ग आहे की नाही हे 30 मिनिटात स्पष्‍ट होईल. या तंत्रज्ञानाने डॉक्टरांना त्वरीत उपचार करता येतील. प्राध्‍यापक जिरो यासूडा आणि त्यांच्या नागासकी विद्यापीठाच्या चमूने विकसित केलेली प्रक्रिया सध्या पश्चिम आफ्रिकेमध्‍ये येणा-या यंत्रणेपेक्षा स्वस्त आहे. आतापर्यंत इबोलाने 1 हजार 500 लोकांचा बळी घेतला आहे.

नवी पध्‍दत ही जुन्या पध्‍दतीपेक्षा साधी असल्याने ती गरीब देशांमध्‍ये वापरण्‍यास सोईचे ठरेल, असे यसुदा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्‍न आणि विनंत येत आहेत. आनंदाने ती पध्‍दत द्यायला आम्ही तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. चमूने एक प्राथमिक घटक बनवलाय. तो फक्त रक्तात इबोला विषाणू असल्याचे स्पष्‍ट करतो, असे यसूदा यांनी स्पष्‍ट केले.