आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्बो नकाशावर साकारले बर्लिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - जर्मनीची राजधानी बर्लिन शहराचा 775 वा वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी जोरात सुरू आहे. वर्धापन दिनानिमित्त जगभरातील पर्यटकांना बर्लिनकडे आकर्षित करून पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून बर्लिन शहराचा विशाल नकाशा तयार करण्यात येत आहे.

274 टेम्प्लेट्सचा वापर करून तयार करण्यात आला विशाल नकाशा. एका टेम्प्लेटचा आकार 3,50 बाय 1,50 मीटर एवढा आहे.
25 ऑगस्टपासून 28 ऑक्टोबरपर्यंत बर्लिनचे नागरिक आणि पर्यटकांना या विशाल नकाशावर चालण्याचा आनंद लुटता येणार आहे.

1237 मध्ये अस्तित्वात आले बर्लिन शहर. 1990 मध्ये जर्मनीच्या एकीकरणानंतर बर्लिनला जर्मनीच्या राजधानीचा दर्जा पुन्हा मिळाला.
190 देशाचे नागरिक राहतात बर्लिनमध्ये. 2011 च्या जनगणनेनुसार बर्लिन शहराची लोकसंख्या 3,501872 एवढी आहे.