आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने पतीच्या गुप्तांगावर चालवली कात्री; डॉक्टर्सनी केली सर्जरी; पत्नीने पुन्हा कापून फेकले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो:रूग्णालयात पत्नीला मारहाण करताना फेन लुंग)
बीजिंग- चीनमधील हेनान प्रांतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांग्की शहरात राहाणार्‍या एका महिलेने तिच्या पतीचे गुप्तांग कात्रीने कापले. पतीने महिलेचा विश्वासघात केला होता. त्यामुळे तिने हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शांग्की शहरात राहाणारी 30 वर्षीय फेंग लुंग हिचा पती फेन (32) याचे विवाहबाह्य संबंध आहे. याचा सुगावा फेंग लुंग हिला लागला होता. फेन याचे एका महिलेसोबत अफेयर सुरु आहे. फेन याने आपला विश्वासघात केल्याचा राग आल्याने फेंग लुंग हिने कात्रीने पतीचे गुप्तांग कापले. डॉक्टरांनी सर्जरी करून फेन याचे गुप्तांग पुन्हा जोडले. मात्र, फेंग लुंग रूग्णालयात आली आणि तिने पुन्हा फेनचे गुप्तांग कापले. एवढेच नव्हे तर खिडकीतून ते बाहेर फेकून दिले. पतीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी फेंग लुंग हिला जेरबंद केले आहे.

काय आहे प्रकरण...
दरम्यान, फेन हा पाच मुलांचा बाप असतानाही त्याचे जॅंग हुंग (21) हिच्यासोबत अफेयर सुरु होते. फेन हा जँग हुंग हिला नेहम अश्लील ईमेल पाठवत असे. एके दिवशी फेन याने त्याची पत्नी फेंग लुंग हिच्या मोबाईलवरून जँग ‍हिला ईमेल पाठवला. मात्र, आपले अकाउंट लॉग आउट करण्याचा त्याला विसर पडला. नंतर त्याची पती फेंग लुंग हिने सर्व ईमेल वाचले. त्यानंतर फेंगचा पारा चढल्यानंतर तिने मागील-पुढील विचार न करता कात्रीने फेन याचे गुप्तांग कापले.

फेन याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. डॉक्टरांनी सर्जरी करून फेन याचे गुप्तांग जोडले. मात्र, फेंग हिचा संताप काही कमी झालेला नव्हता. ती रुग्णालयात दाखल झाली आणि तिने पतीच्या गुप्तांगवर पुन्हा कात्री चालवली. एवढेच नव्हे तर फेन हिने कापलेले गुप्तांग तिने खिडकीतून बाहेर फेकून दिले.

डॉक्टर आणि पोलिस अधिकार्‍यांनी रुग्णालयाबाहेर फेन याचे गुप्तांग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. कुत्रा अथवा मांजराने गुप्तांग नेले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रक्तस्राव होत असल्याने पीडित फेन याला ICU मध्ये हलवण्यात आले आहे. फेन याची प्रकृती स्थीर असून त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

प्रेयसीने दिले विवाहाचे वचन...
फेन याला गुप्तांग नसले तरी काही फरक पडत नसल्याचे त्याची प्रेयसी जँग हुंगने म्हटले आहे. फेन दुखण्यातून सावरल्यानंतर त्याच्याशी आपण विवाह करणार असल्याचे जँग हिने म्हटले आहे .
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...