आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलीफीशच्या अमरत्वाचे गूढ ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जेलीफिशची एक विशिष्ट प्रजाती अमर आहे. ट्युरीटॉपसिस न्यूट्रिक्युला (मेड्युसा) नावाचा हा जेलीफिश कधीही मरत नाही. मेड्युसा हा जेलीफिश स्वत:च्या पेशी परिपक्व झाल्यानंतर पुन्हा त्यांना अपरिपक्व बनवतो. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास तो स्वत:ला पुन्हा तरुण बनवतो. मेड्युसा हा मासा एखाद्या सामान्य माशाप्रमाणे आयुष्य जगतो, पण परिपक्व झाल्यानंतर तो पुन्हा पोलिप या अपरिपक्व अवस्थेत जातो. या प्रक्रियेला ट्रान्सडिफरन्शिएशन म्हटले जाते. त्यामुळे जेलीफिशचा कधीही नैसर्गिक मृत्यू होत नाही. घंटेच्या आकाराचा हा मासा 4.5 मिलिमीटर लांबीचा असतो.

कॅरेबियन बेटांवर निर्माण झालेली ही जात आता संपूर्ण जगात आढळून येते. अमरत्व प्राप्त केलेल्या या खास प्रजातीच्या वैशिष्ट्यांमुळे शास्त्रज्ञांसाठी हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेमागील गूढ उलगडण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. ते रहस्य उलगडल्यास वृद्धापकाळात मानवाला आणखी चांगले आयुष्य जगता येईल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.


boredpanda.com