आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हंगेरीत प्रबळ होतोय यहुदींचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपूर्वी बुडापेस्टमध्ये सुरू झालेल्या ‘माशेज हस्जर’ रेस्टॉरंटमध्ये जमलेला जनसमुदाय हंगेरीत यहुदी संस्कृती परतण्याचे संकेत देते. आधी नाझी आणि नंतर साम्यवादी शासनाने या संस्कृतीला उद्ध्वस्त केले होते. रेस्टॉरंटमध्ये यहुदी पक्वान्नांचा आनंद घेणा-या लोकांना चिंता सतावतेय की, देश पुन्हा एकदा यहुदींचा शत्रू तर बनत नाही ना? हा प्रश्न आश्चर्यजनक आहे. कारण बुडापेस्टमध्ये जवळपास एक लाखावर यहुदी राहतात. मध्य युरोपातील यहुदींची ही सर्वात मोठी संख्या आहे. अर्थव्यवस्थेची झालेली दुरवस्था आणि वाढत्या द्वेषामुळे यहुदी मोठ्या प्रमाणावर हंगेरी सोडत आहेत किंवा याची तयारी करत आहेत.


यहुदींना स्वत:च्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. जूनमध्ये बुडापोस्टचे निवृत्त प्रमुख रब्बी जोसेफ श्वेट्जर यांचा एक माणूस पाठलाग करत होता. ऑक्टोबरमध्ये दोन लोकांनी यहुदी नेते आंद्रास केरेन्यी यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांच्या अटकेनंतर एका ऑनलाइन रेडिओने त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळत हे यहुदी दहशतवादाला चोख उत्तर असल्याचे म्हटले. मागील काही महिन्यांमध्ये यहुदींच्या अनेक कबरींची तोडफोड करण्यात आली. नाझींच्या नरसंहाराच्या स्मृतीत उभारण्यात आलेल्या स्मारकांना पाडण्यात आले आहे. धार्मिक ठिकाणांवर स्वस्तिकचे चिन्ह कोरण्यात आले. या वर्षी 14 मार्चला इओटवोस लॉरेंड विद्यापीठातील शिक्षकांना त्यांच्या कार्यालयात ‘यहुदींनो, हे विद्यापीठ आमचे आहे, तुमचे नाही,’ असा संदेश चिकटवलेला मिळाला.

बुडापेस्टच्या ‘सेंट्रल ओपन युनिर्व्हसिटी’तील मनोविकारतज्ज्ञ आंद्रास कोवॉक्स यांच्या संशोधनानुसार 1992 ते 2006 दरम्यान हंगेरीत यहुदींच्या विरोधाचे प्रमाण अत्यल्प होते, परंतु 2006 च्या सुरुवातीला जेव्हा अर्थव्यवस्था खराब होण्यास प्रारंभ होण्यास सुरुवात झाली आणि थेट उजवा पक्ष बळकट होण्यास प्रारंभ झाला आणि विरोधातील भावनाही प्रबळ होत गेल्या. 2010 पर्यंत यहुदींच्या विरोधकांचे प्रमाण वाढत 20 टक्क्यांवर गेला. हंगेरीत यहुदींच्या विरोधाचा जुनाच इतिहास राहिला आहे. नाझींच्या नरसंहारात जवळपास पाच लाख 60 हजार यहुदींची कत्तल करण्यात आली होती. साम्यवादी शासन काळात धार्मिक भावना व्यक्त करण्यावर बंदी घालण्यात आली होती आणि याचमुळे यहुदींचा विरोधही कमी झाला होता, परंतु 1990 मध्ये याच्या पतनानंतर विरोधाची भावना पुन्हा बळावत गेली. एकट्या यहुदींनाच या कट्टरवादीपणाचा परिणाम भोगावा लागलेला नाही. रोमा समाजही याचा बळी ठरला आहे. कोवॉक्स सांगतात, याच्या मुळाशी हंगेरीत उजव्या विचारसरणीचा उदय हेच कारण आहे. रॉब्बिक किंवा मूव्हमेंट फॉर ए बेटर हंगेरी सर्वात अग्रगण्य अतिरेकी उजवा पक्ष आहे. 2010 च्या निवडणुकांमध्ये 16.7 टक्के मतांसह हा तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. यहुदी राजकारणाशिवाय आर्थिक परिस्थितीमुळेही हंगेरी सोडत आहेत. हंगेरीत बेकारीचा दर 11.2 टक्के आहे. आणि 2012 मध्ये याचे स्थूल एतद्देशीय उत्पादन (जीडीपी) 1.7 टक्के कमी झाला, परंतु ज्या लोकांना सहजासहजी नोकरी मिळू शकते, तेही भीतीपोटी पर्यायांचा शोध घेत आहेत.