आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jihadi John Wounded In Us Airstrike That Killed 10 Top ISIS Commanders

ISISकडून पुन्हा एका अमेरिकीचा शिरच्छेद, सिरियाच्या सैनिकांचीही क्रूरतेने हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत -सिरियामधून अपहरण केलेल्या एका अमेरिकी मदत पथकातील सदस्य पीटर कसिग याचा शिरच्छेद केल्याचा दावा इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने एका चित्रफितीद्वारे केला आहे.
या चित्रफितीमध्ये एकूण 18 जणांना एकत्रित शिरच्छेद केल्याचे दाखवण्यात आले असून यातील बहुतांश सिरियाच्या लष्करातील जवान आहेत. सामूहिक हत्याकांडाची ही सर्वांत भयंकर चित्रफित मानली जाते. चेहरा झाकलेल्या एका दहशतवादी या चित्रफितीमध्ये पीटर एडवर्ड कसिग याच्याबद्दल माहिती देत असल्याचे दाखवण्यात आले असून तो एका धड नसलेल्या शिराजवळ उभा आहे. हे शीर कसिगच्या चेहर्‍याशी मिळतेजुळते आहे. कसिग अमेरिकी नागरिक असल्याचा स्पष्ट उल्लेख हा दहशतवादी करतो. यापूर्वी दोन अमेरिकी पत्रकार आणि दोन ब्रिटिशांचाही शिरच्छेद झाला होता.

दाबिकचा इतिहास
सोळाव्याशतकात दाबिकमध्ये भयंकर युद्ध झाले होते. ओटोमनने ममलुकोवर विजय मिळवला होता. या युद्धानंतरच खर्‍या अर्थाने या भागात साम्राज्याच्या विस्तारवादाचा पाया घातला गेला. हेच विस्तारवादी धोरण आयएसने अवलंबले असल्याचे दिसते. आयएसने आतापर्यंत इराक सिरियामध्ये आदिवासी जमातीच्या शेकडो लोकांची हत्या केली असून महिलांना ओलिस ठेवून त्यांची विक्री चालवली आहे.

(फोटो - अमेरिकी मदत पथकातील सदस्य पीटर कसिग )

पुढील स्लाइडमध्ये, आयएसआयएसकडून पत्रकार सोटलॉफच्या शिरच्छेदाचा व्हिडिओ