आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jihadi John Wounded In Us Airstrike That Killed 10 Top ISIS Commanders

VIDEO: अमेरिकन-ब्रिटीश नागरिकांचा शिरच्छेद करणारा \'जिहादी जॉन\' गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - दोन ब्रिटीश नागरिक आणि दोन अमेरिकी पत्रकारांचा शिरच्छेद करुन चर्चेत आलेला आयएसआयएसचा दहशतवादी 'जिहादी जॉन' अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने उत्तर इराकच्या अनबर प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात आयएसआयएसचा (आताचे इस्लामिक स्टेट) म्होरक्या कमांडर बगदादीसह 10 जण ठार झाले, तर 40 दहशतवादी गंभीर जखमी झाले होते. बगदादी मारला गेल्याच्या वृत्ताला अजून दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र जिहादी जॉन सिरियाच्या बॉर्डरवर एका बंकरमध्ये आयएसआयएस प्रमुखासोबत उपस्थित होता, तेव्हाच अमेरिका आणि इराकच्या जेट विमानांनी हल्ला केला होता.
सूत्र सांगतात, की हल्ल्यानंतर जखमी जिहादी जॉनला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. ब्रिटीश परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, इराक आणि सिरियामध्ये त्याचे अनेक सूत्र कार्यरत आहेत, जे या ब्रिटीश दहशतवाद्याच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने नजर ठेवून आहेत. अमेरिका आणि इराकने संयुक्तरित्या केलेला हल्ला बगदादीला मारण्यासाठी होता की जिहादी जॉनला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
कोण आहे, जिहादी जॉन
इस्लामिक स्टेटच्या या दहशतवाद्याने ऑगस्टपासून आतापर्यंत चार जणांचा निर्घृणपणे शिरच्छेद केला आहे. यात दोन अमेरिकेचे पत्रकार होते(जेम्स फोले आणि स्टिव्हन सोटलॉफ), तर दोन ब्रिटीश नागरिक होते (डेव्हिड हँस आणि ऐलन हेनिंग).
जिहाद जॉन त्याचे रंगरूप आणि राहाणीमानावरुन ब्रिटीश असल्याचे मानले जात आहे. वास्तविक त्याची ओळख अजून पटलेली नाही. आयएसआयएस दहशतवादी संघटनेत तो जलमन अल ब्रिटानी नावाने कुख्यात आहे.
पुढील स्लाइडमध्ये जॉन संबंधीत व्हिडिओ आणि फोटो...