फाइलफोटो - निर्वासितांच्या छावणीकडे जाणारे नागरिक.
किर्कुक(
इराक) :
इराकमधील क्वाराकोश या सर्वात मोठ्या ख्रिश्चन शहरावर दहशतवाद्यांनी ताबा मिळवला आहे. तसेच शहराच्या आसपासच्या परिसरावरही बंडखोरांनी ताबा घेतला आहे. कुर्दीश सैन्याच्या तुकड्यांनी रात्रीतून माघार घेतल्यानंतर या दहशतवाद्यांनी शहरावर कब्जा केला. नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाल्यानंतर रहिवासी आणि धर्मगुरूंनी याबाबत माहिती दिली.
क्वाराकोश, तल काय्फ, बारतेला आणि कराम्लेश या शहरातून मूळ रहिवासी पूर्णपणे निघून गेले असून आता याठिकाणी दहशतवाद्यांचा ताबा असल्याचे धर्मगुरू जोसेफ थॉमस यांनी सांगितले. वृत्तसंस्थांनी काही स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इराकमधील सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेला हा प्रदेश बंडखोरांच्या ताब्यात गेल्याचे त्यांनी सांगितले.