आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - पाकिस्तानचे संस्थापक बॅ. मोहंमद अली जिना यांच्या भाषणाच्या दोन महत्त्वपूर्ण ध्वनिफिती पाकिस्तानला सोपवण्यात आल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओने 3 जून 1947 रोजी जिना यांचे ध्वनिमुद्रित केलेल्या भाषणाचा त्यात समावेश आहे. स्वातंत्र्यापूर्वी दोन महिने आधी केलेल्या भाषणात जिना यांनी पाकिस्तान व भारतालगतच्या वायव्य सरहद्द प्रांत पाकिस्तानमध्ये सार्वमत घेण्याच्या निर्णयावर आपले मत मांडले आहे.
दुसरी ध्वनिफीत 14 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणाची आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानातील नागरिकांच्या कल्याणाची मनोकामना केली आहे. आम्हाला दोन्ही ध्वनिफिती मिळाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही ऑल इंडिया रेडिओचे आभार व्यक्त करतो, असे पाकिस्तान रेडिओच्या करंट अफेअर विभागाचे प्रमुख जावेद खान यांनी सांगितले. भाषणे इंटरनेटवर उपलब्ध झाली. अधिका-यांनी ती डाऊनलोड करून त्याचे सीडीत रूपांतर केले. पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे तत्कालीन प्रमुख मुर्तझा सोलांगी यांनी 29 मार्च 2012 रोजी एआयआरचे महासंचालक लीलाधर मंदलोई यांना पत्र लिहून ध्वनिफिती सोपवण्याची विनंती केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.