आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'jirga' Formed To Save Dilip Kumar's Ancestral Home In Pakistan ‎

दिलीपकुमार यांच्या घरासाठी ‘जिर्गा ’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील वडिलोपाजिर्त घराच्या संरक्षणासाठी काही समाजसेवकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिर्गा अर्थात संरक्षणाचे काम करणार्‍या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील सिव्हिल सोसायटीचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत. यात बांगलादेश, भारत, पाकिस्तान पीपल्स फोरमचादेखील सहभाग आहे. या मंडळाच्या माध्यमातून घराच्या संवर्धनासाठी पत्रकार, स्तंभलेखकदेखील सरसावले आहेत. यात सईद बुखार शाह, नासीर हुसैन यांचा सहभाग आहे. हे मंडळ स्थापन करण्यासाठी दिलीप कुमार यांच्या घरात कार्यकर्त्यांची बैठक झाली.
या घराचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला अलीकडेच खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने स्थगिती आणली आहे. या मालमत्तेवर अनेकांनी दावा सांगितल्यामुळे सरकारला स्मारकाचा विचार पुढे ढकलावा लागला. आता जिर्गा गटाचे सदस्य लवकरच सरकारसोबत चर्चा करणार आहेत. या वास्तूचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येईल.
दिलीपकुमार यांच्या ‘पुश्तैनी’ घराची ट्रॅजिडी!