आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारांच्या संख्येत यंदा ५० लाखांने होणार वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील बेरोजगारांच्या संख्येत २०१२ मध्ये ४० लाखांहून अधिकची वाढ झाली असून ही संख्या आता १९ कोटी सात लाखांपर्यंत पोहचली आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या कामगारांसाठी काम करणा-या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या (आयएलओ) एका अहवालातून बेरोजगारीचे हे संकट समोर आले आहे.

'ग्लोबल एम्पलॉयमेंट ट्रेंड २०१३' या नावाने प्रसिध्द झालेल्या या अहवालात २०१३ मध्ये जगातील बेरोजगारांच्या संख्येत ५० लाखांने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१४ मध्ये ही संख्या ३० लाखांच्यावर जाणार असल्याचे त्यात म्हटले आहे. या परिस्थितीला अर्थव्यवस्थेत होणारी घसरण कारणीभूत असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. ही परिस्थिती विकसीत देशांमध्ये जास्त पाहायला मिळत आहे.

या अहवालानुसार बेरोजगारीचा फटका २४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांना बसत आहे. जगभरातील २४ वर्षांपेक्षा कमी वयाचे १३ टक्के युवक बेरोजगार आहेत. तसेच अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, तात्पुरत्या स्वरूपात किंवा कायमची बेरोजगारी वाढण्याचे प्रमाणही मोठे आहे. केवळ युपोपातील एक तृतियंश लोकसंख्या गेल्या एक वर्षापासून बेरोजगारीचा सामना करत आहे.

आयएलओचे संचालक गाय राईडर यांच्यानुसार, अनिश्चित अर्थव्यवस्था आणि अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने बाजारातील मागणी कमी झाली आहे. गुंतवणूकदार आता तिथे पैसे लावण्यास तयार नाहीत.

या अहवालात रोजगार निर्मीती करणा-या प्रशिक्षणावर गुंतवणूक करण्याची सुचना मांडण्यात आली आहे. ज्यामुळे युवकांना व्यवसायाभिमूख शिक्षण देता येईल. असे शिक्षण नसल्यामुळे युवा शक्ती आणि त्यांचे कौशल्य वाया जात आहे. हे केवळ त्यांचे व्यक्तिगत नुकसान नसून समाजालाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

ज्या देशांमध्ये इंटर्नशिपची सुविधा आहे तेथील युवकांवर बेरोजगारीचा तेवढा फटका बसत नाही जेवढा ही सुविधा नसलेल्या देशांना बसतो, असे आयएलओच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.