अमेरिकेच उपराष्ट्राध्यक्ष जो बाइडेन, त्यांची पत्नी आणि कुटंबातील ११ सदस्यांनी एका राष्ट्रीय उद्यानात सुटी घालवण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाइडेन यांचा चमू ऑगस्टमध्ये ग्रँड टीटोन राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रिंकरहॉफ लॉजमध्ये चार दिवस थांबला होता. अतिविशेष सरकारी पाहुणे थांबल्यावर विवाद उठल्यानंतर वीस वर्षांपूर्वी उद्यानाचा वापर मर्यादित केला होता. परंतु, अलीकडेओबामा प्रशासनातील मंत्री आणि मोठ्या अधिकार्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर लॉजमध्ये थांबणे सुरू केले आहे.
टाइमने माहिती अधिकाराने गोळा केलेल्या माहितीतून उघड झाले की, बाइडेनसोबतच चार कॅबिनेट स्तर अधिकारी, व्हाइट हाउसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ आणि उद्यान सेवेच्या संचालकांनी २०११ नंतर लोकांना इथे थांबवले आहे. उद्यान सेवेचे म्हणणे आहे, या प्रकारची ट्रिप सरकारी कार्यक्रमांशी संबंधित होती. सरकारी अधिकार्यांना
आपल्या पाहुण्यांचे बिल भरावे लागते. टाइमने या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा बहुतांश लोकांनी बिल भरले.
ब्रिंकेरहॉफ लॉज ओबामा प्रशासनातील उच्च अधिकार्यांची आवडते ठिकाण आहे. २०११ मध्ये माजी पर्यावरण सुरक्षा सस्थेचे प्रशासक लीझा जॅक्सन पती आणि इतर पाच जणांसोबत थांबल्या होत्या. माजी वाहतूक मंत्री रे लाहूड २०१२ मध्ये पत्नी, पुत्र इलिनॉयचे सीनेटर डेरिन लाहूड, सून, तीन मुले आणि इतर दोघांसोबत आठ रात्री थांबल्या होत्या. शिक्षण मंत्री अर्ने डंकन पत्नी, मुलांसोबत २०१३ मध्ये सहा दिवस थांबले होते. माजी गृहमंत्री केन सालाजार, व्हाइट हाउसचे माजी विशेष सल्लागार फिल स्किलिरो पत्नी, मुलांबरोबर थांबले होते. उद्यान अधिकार्यांचे म्हणणे आहे या सर्वांचा दौरा शासकीय होता.
उद्यान सेवा नियमांच्या अनुसार ब्रिंकेरहॉफ लॉजचा वापर फेडरल कर्मचारी प्रशिक्षण व परिषदांसाठी होतो. उद्यान प्रवक्ता जॅकी स्केग्स सांगतात, बाइडेन कुटुंबाचा दौरा नियमानुसार होता. उपराष्ट्राध्यक्षांच्या पतीला शासकीय कामासाठी इथे थांबण्याचा अधिकार आहे. याप्रकरणी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गृह विभागाने २८ ऑक्टोबरला सांगितले, लॉजच्या व्यवस्थापनाची चौकशी करत आहे. उपराष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने सांगितले, बाइडेन परिवार लॉजमध्ये थांबण्याचा १२०० डॉलरचे बिल भरले आहे. डंकन आणि लाहूड म्हणतात, आता ते बिल पाठवणार आहेत.