आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Kerry Fined For Failing Shovel Sidewalk Outside Home

बर्फ न हटवल्याने अमे‍रिकेच्या परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांना दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: परराष्‍ट्र मंत्री जॉन केरी
बोस्टन - अमेरिकेचे परराष्‍ट्रमंत्री जॉन केरी यांना बोस्टनच्या स्थानिक प्रशासनाने दंड ठोठावला आहे. वास्तवात बोस्टनमध्‍ये या आठवड्यात हिमवादळ आले होते. त्याने शहरातील बहुतेक भाग आणि घरांवर दोन फुटांपर्यंत बर्फ जमा झाले होते. यामुळे वाहतूक व्यवस्था आणि उद्योगधंदे प्रभावित झाले होते. प्रशासनाने नागरिकांना बर्फ हटवण्‍याची विनंती केली होती.
बोस्टनचे महापौर मार्टन वॉल्श हे संपूर्ण शहर फ‍िरले आणि लोकांना बर्फ हटवण्‍याचे त्यांनी सांगितले होते. परंतु याबाबत जॉन केरी यांनी कोणतेही पाऊल न उचल्याने त्यांना 3 हजार 91 रुपयांचा दंड करण्‍यात आला. दरम्यान केरी हे सौदी अरेबियात होते. ते ओबामांनसह राजे अब्दुल्लाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्‍यासाठी गेले होते. त्यांचे प्रवक्ते ग्लेन जॉन्सनने म्हटले आहे, की केरी दंडाची रक्कम जरुर भरतील.

पुढे पाहा, बिकन हिल येथील केरी यांच्या बंगल्याची छायाचित्रे...