आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन केरी अमेरिकेचे नवे परराष्‍ट्रमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- अमेरिकेतील अनुभवी राजकीय नेते जॉन केरी यांनी आज अमेरिकेचे परराष्‍ट्रमंत्री म्‍हणून शपथ घेतली आहे. हिलरी क्‍लिंटन यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलिना केगन यांनी जॉन केरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांची पत्नी तेरेसा हेंझ केरी, मुलगी व्हेनेस्सा, भाऊ कॅमेरॉन आणि त्यांचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

जॉन केरी हे 2004 मध्‍ये अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत उमेदवार होते. परराष्‍ट्रमंत्री पदाची शपथ घेतल्‍यानंतर केरी म्‍हणाले, हा माझ्यासाठी मोठा सन्‍मान असून परराष्‍ट्रमंत्री म्‍हणून काम करण्यास मी उत्सुक आहे.

केरी हे भारत आणि पाकिस्‍तानात शांतता चर्चेचे पुरस्‍कर्ते आहेत. अमेरिकेच्‍या दृष्‍टीने 21 व्‍या शतकात काही देशांचे संबंध अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत. गेल्या तीन दशकांपूर्वी जॉन केरी यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. राष्‍ट्रपती बराक ओबामा यांच्‍या अतिशय विश्वासू व्‍यक्तींमध्‍ये केरी यांचा समावेश आहे. अनेक वेळा ते ओबामा प्रशासनाचे संकटमोचक होते. पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले असताना जॉन केरी अनेक वेळा अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मदतीसाठी पुढे आले होते.