आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jonathan The OldestTortoise In The World, Divya Marathi

लंडनमध्‍ये आहे जगातील सर्वाधिक वयस्कर कासव, वय वर्ष 182

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगातील सर्वाधिक वयस्कर कासव लंडनमध्‍ये आहे. त्याचे नाव जोनाथन असे आहे. सध्‍या त्याचे वास्तव्य लंडनमधील सेंट हेलिना आयसलॅंडमध्‍ये आहे. जोनाथन 182 वर्षांचा आहे. 1882 मध्‍ये सेंट हेलिना बेटावर तीन कासवांचे आगमन झाले होते. त्यापैकी सध्‍या जोनाथन हा कासव जिवंत आहे. त्याचा जन्म 1832 मध्‍ये झाला होता. त्याचे पहिले छायाचित्र 1902 मध्‍ये घेण्‍यात आले होते.
जोनाथन जेव्हा सेंट हेलिनाच्या दक्षिण अटलांटिक बेट समूहावर आला होता, तेव्हा तो होता 50 वर्षांचा. याचाच आधार घेऊन त्याच्या सध्‍याच्या वयाचे अंदाज बांधले जाते. नुकतेच भारतात 255 वयांचा कोलकाताच्या अल‍ीपूर प्राणीसंग्रहालयात एक कासव असल्याची बातमी आली होती.

पुढे पाहा जगातील सर्वाधिक वयस्कर जोनाथन कासवाची छायाचित्रे....