लंडन- ISIS या दहशतवादी संघटनेने जॉर्डनचा वैमानिक मुआद अल कस्साबेह याला जाळून ठार मारल्याने या देशात प्रचंड संतापाची लाट उमटली आहे. ISIS ची पाळेमुळे खणून नेस्तनाबुत केली जातील, असा विडाच जॉर्डनने उचलला आहे. त्यात आघाडीवर आहेत जॉर्डनचे किंग अब्दुल्ला. या दहशतवादी कृत्यानंतर अब्दुल्ला स्वतः लढाऊ विमानात बसून ISIS विरुद्धच्या हवाई हल्ल्याचे नेतृत्व करु शकतात अशी माहिती मिळत आहे.
शफाकना न्युज आणि
इराक न्युज डॉट कॉमने जॉर्डन राज्याशी निगडित सुत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे, की ISIS विरुद्ध हवाई हल्ला करताना त्यात किंग अब्दुल्ला खासगी पातळीवर सहभागी होऊ शकतात. या हल्ल्यांचे ते स्वतः नेतृत्वही करु शकतात. जॉर्डनच्या एका लेखकाने स्थानिक मीडियात आलेल्या वृत्तानुसार सांगितले, की दहशतवादी कृत्याने किंग अब्दुल्ला प्रचंड चिडले आहेत. याचा ते नक्किच बदला घेतील. त्यासाठी स्वतः हवाई हल्लाचे नेतृत्व करु शकतात.
मिडल ईस्टमधील घडामोडींचे विश्लेषक जोसेफ ब्राऊड म्हणाले, की जॉर्डन कडून हवाई हल्ला केला जाईल तेव्हा जॉर्डन किंग त्यात सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
वैमानिकाला जाळून ठार मारल्यानंतर जॉर्डन किंग अब्दुल्ला यांनी एका चित्रपटातील डॉयलॉग म्हटला होता. ते म्हणाले होते, की "I'm not only going to kill him, I'm going to kill his wife and all his friends and burn his damn house down." इंग्रजी चित्रपट Unforgiven मधील हा संवाद आहे. यातील हिरोने बदला घेण्यासाठी हे वाक्य म्हटले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, किंग होण्यापूर्वी अब्दुल्ला ब्रिटिश लष्करात सेकंड लेफ्टनंट होते...