आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jordan Again Started Air Strikes On ISIS Terrorist In Iraq And Syria

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS ला नेस्तनाबुत करण्यासाठी जॉर्डनने हवाई हल्ले सुरु केले, बघा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अम्मान- ISIS च्या दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या वैमानिकाला जाळून ठार मारल्यानंतर या देशाने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यास सुरवात केली आहे. विशेष करुन या हल्ल्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. यात लढाऊ विमान सज्ज करण्यापासून जोरदार हल्ले करण्यापर्यंतच्या दृष्यांचा समावेश आहे. शिवाय काही महिला वैमानिक लढाऊ विमान उडवतानाही दिसत आहेत. या अभियानाला 'मुआद अल कस्साबेह' असे नाव देण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर शासकीय वाहिनीवर याचे प्रसारणही करण्यात आले. जॉर्डनचे किंग अब्दुल्ला यांनी कस्साबेह याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर लगेच हे हल्ले सुरु करण्यात आले.
लढाऊ विमानांचे उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकांनी आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मिसाईलवर अरबी भाषेत संदेश लिहिला. उड्डाण करण्यापूर्वी एका वैमानिकाने एक पाटीही झळकावली. त्यावर लिहिले होते, की हे विसरू नका की अल्लाला हे माहित नाही. हे वाक्य कुराणमधून घेण्यात आले आहे, असे समजते. जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री नसीर जुदेह यांनी सांगितले, की आमच्या सुडाची ही सुरवात आहे. सीरियातही ISIS च्या ठिकाणांवर बॉम्बफेक केली जाणार आहे.
जॉर्डनच्या किंगने गुरुवारी कस्साबेह याच्या कुटुंबीयाची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. यावेळी अब्दुल्ला म्हणाले, की वैमानिकाचे बलिदान वाया जाणार नाही. दहशतवाद्यांनो तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल.
पुढील स्लाईडवर बघा, जॉर्डनच्या वायुदलाने केलेल्या हल्ल्याचा लाईव्ह व्हिडिओ आणि इतर फोटो....