आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्णभेदी जॉर्ज झिमरमनच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- कृष्णवर्णीय मुलाचा बळी घेणारा गौरवर्णीय वॉचमन जॉर्ज झिमरमन याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. झिमरमनला जामीन मिळवण्यासाठी आपण न्यायालयात खोटी साक्ष दिली होती अशी कबुली तिने गेल्या आठवड्यात दिली होती.

शेली झिमरमन असे तिचे नाव असून खोटी साक्ष दिल्याबद्दल तिला एक वर्षाची शिक्षा आणि 100 तासांची समाजसेवा करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सुनावणीच्या वेळी झिमरमन न्यायालयात हजर नव्हता.आपल्या पतीच्या कृष्णकृत्याबद्दल तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे किंवा कसे याबाबत कळू शकले नाही.

गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 झिमरमन याने 17 वर्षीय ट्रेव्हन मार्टीन याची गोळ्या घालून हत्या केली होती. विशेष म्हणजे सॅनफोर्ड न्यायालयात त्याची स्व संरक्षणाच्या युक्तिवादावर हत्येच्या आरोपातून निदरेष मुक्तता करण्यात आली होती. या सुटकेनंतर अमेरिकेत वर्णभेदाच्या मुद्यावरून प्रचंड काहूर माजले होते. 26 वर्षीय शेली हिने गुरु वारी सेमिनोल काऊंटी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. गतवर्षी जून महिन्यात पतीच्या जामीनासाठी रक्कम ठरवत असताना तिने न्यायधीशांना मालमत्तेबाबत खोटी माहिती दिली होती.