आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Julia Gillard\'s Abortion Comments Prompt War Of Words With Coalition

आपल्या नावाचा \'सेक्सी मेन्यू\' बनविल्यामुळे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान भडकल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- ऑस्ट्रेलियातील सार्वत्रिक निवडणूकीच्या उमेदवार माल ब्रॉ यांनी ठेवलेल्या डिनरमध्ये वापरण्यात आलेल्या मेन्यू कार्डमुळे पंतप्रधान ज्यूलिया गिलार्ड चांगल्याच भडकल्या आहेत. तसेच विरोधी पक्षाने आपल्या सदस्या व उमेदवार ब्रॉ यांना हाकलून देऊन त्यांना दिलेले समर्थन बंद करावे अशी मागणी केली आहे. या मेन्यूला ज्यूलियांनी 'ग्रॉसली सेक्सिएस्ट व ऑफेंसिव्ह' म्हटले आहे.

दुसरीकडे, आपल्याविरोधात नाराजीचा भडका वाढत चालल्याचे लक्षात येताच ब्रॉ यांनी माफी मागितली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना ब्रा म्हणाल्या, हा मेन्यू नॉन-पार्टी सदस्याने बनविला होता तसेच त्याचा यामागे हा विचार होता की, लोक ही बाब हसण्यावारी नेतील. मात्र या मेन्यूमुळे सगळ्यांनाच लाज व किळस वाटली.

ब्रॉ यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या आधी आपण हा मेन्यू पाहिला नव्हता तसेच त्याला मान्यता दिली नव्हती. 28 मार्च रोजी ब्रिस्बेनमध्ये ब्रॉ यांनी 20 लोकांना डिनरसाठी बोलावले होते. त्यावेळी या पाहुण्यांसाठी एक विशेष डिश बनविली गेली होती ज्याचे नाव होते 'ज्यूलिया गिलार्ड केंटकी फ्राइड क्वेल: स्मॉल ब्रेस्ट्स एंड ह्यूज थाइज एंड ए बिग रेड बॉक्स'.

लिबरल नॅशनल पार्टीने आपल्या सदस्या ब्रॉ यांच्या या फालतूगिरीपासून अंतर ठेवत पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. याबाबत पक्षाने निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात म्हटले आहे की, 'मेन्यू कार्डमध्ये जो मजकूर, शब्द वापरले आहेत ते अस्वीकृत आहेत. तसेच एलएनपीचा या खासगी कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही.

दुसरीकडे, गिलार्ड यांनी विरोधी पक्षावर हल्ला करीत हा मेन्यू विरोधी पक्षाची संस्कृती व विचारधारा दर्शवते असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ' निरोधी पक्षनेते टोनी एबॉट यांनी ब्रॉ यांच्या बाजूने उभे राहणे योग्य नाही. जर एबॉट पंतप्रधान बनले तर, ब्रॉ त्यांच्या मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री असतील. खरे तर त्यांनी ब्रॉ यांचे समर्थन न करता त्यांना बाहेररचा रस्ता दाखवला पाहिजे.

याआधी बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते टोनी एबॉट यांनी मेन्यू कार्डबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी हे ही स्पष्ट केले होते की, ब्रॉ यांना मंत्रीपद देण्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.