आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Julian Assang News In Marathi, Wikleaks, DIvya Marathi

ज्युलियन असांज लवकरच इक्वेडोर दूतावास सोडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजने लंडनमधील इक्वेडोरचे दूतावास सोडणार असल्याची घोषणा केली आहे. जून 2012 पासून त्यांनी येथे आश्रय घेतला आहे. दूतावास कधी सोडणार याची त्यांनी काहीही कल्पना दिली नाही.

ऑस्ट्रेलियात जन्मलेले असांज विकिलिक्स वेबसाइटचे संस्थापक आहेत. या वेबसाइटने अमेरिकेतील लाखो गोपनिय दस्तऐवज उघड केले आहेत. असांजच्या पत्रकार परिषदेत इक्वाडोरचे परराष्‍ट्रमंत्री रिकार्दो पतीनो उपस्थित होते. इक्वेडोर असांजला यापुढेही सुरक्षा देत राहिल, असे ते म्हणाले. इक्वेडोर दूतावासाबाहेर तैनात ब्रिटिश पोलिसांनी सुरक्षा कडे उभारले आहे. ब्रिटनने या बंदोबस्तावर आतापर्यंत 70 लाख पाउंड (जवळपास 42.53 कोटी रुपये) खर्च केले आहेत. दुतावासाबाहेर पडताच असांजला अटक केली जाईल.

लपण्याचे कारण काय? : असांज यांनी अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित लाखो गोपनिय कागदपत्रे उघड केले आहेत. स्वीडनमध्ये त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला सुरू आहे. स्वीडिश न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचे अटक रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे.