ओस्लो (नार्वे)- भारताचे बालहक्क चळवळीचे कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई या दोन्ही शांतीदुतांना सर्वोच्च नोबेल पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. या दोघांसह 11 जणांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे हा दिमाखदार सोहळा सुरु आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजईला नोबेल पुरस्कार प्रदान होताच दोघांचे अभिनंदन केले आहे.
वेदातील मंत्राने मनोगताला सुरुवात...
कैलास सत्यर्थी यांनी
आपल्या मनोगताची सुरुवात वेदातील एका मंत्राने केली. सत्यर्थी म्हणाले, बालकामगारीतून मुक्त झालेल्या चिमुरड्यांच्या चेहर्यावरील आनंद मी पाहिला आहे. त्यामुळे विश्व कल्याणासाठी काम करण्याची गरज आहे. सत्यर्थी यांनी आपल्याला मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचे श्रेय चळवळीत शहीद झालेल्या आपल्या मित्रांना दिले. आपल्या आई-वडीलांसह भारत देशाचा उल्लेख केला. एवढेच नाही तर गौतम बुद्धांच्या नावाचाही उल्लेख केला.
मुलांचे स्वप्न मोडणे ही एक प्रकारची हिंसाच...
जगाला शांततेचा संदेश यायचा असेल तर सुरुवात मुलांपासून करा, असे महात्मा गांधी नेहमी सांगत असत. मुलांचे स्वप्न मोडणे ही एक प्रकारची हिंसाच आहे. त्यांना शिक्षण दिले नाही तर मानवतेचे सगळ्यात मोठे नुकसान होईल, असेही कैलास सत्यर्थी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आज एका भारतीय पित्याला मलालाच्या रुपात पाकिस्तानची मुलगी भेटल्याचे सत्यर्थी म्हणाले.
शिक्षण घेऊ इच्छीत असलेल्या प्रत्येक मुलीचा मी आवाज होईल- मलाला
आईने नेहमी खरं बोलण्याची शिकवण दिल्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकले. आपल्याला कमी वयात सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने आपल्याला भरभरून आनंद झाल्याचे पाकिस्तानच्या मलाला युसुफझई हिने सांगितले. नोबेल पुरस्कार मिळाल्याचे संपूर्ण श्रेय मलाला हिने आई वडील आणि शिक्षकांना दिले. तसेच नोबेल पुरस्कारात मिळालेली रकम मलाला हिने दान केली आहे.
यापुढे भारत आणि पाकिस्तान शांततेसाठी एकत्र काम करेल, अशी अपेक्षाही मलाला हिने यावेळी व्यक्त केली. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी नेहमीच झगडत राहील. दहशतीमुळे घाबरलेल्या मुलांना विकासाचे मोठे आव्हान असल्याचे मलाला म्हणाली.
एका माणसाची हत्या म्हणजे संपूर्ण मानव जातीची हत्या असल्याचे पवित्र कुराणमध्ये सांगितले आहे. मलालाने इस्लामच्या नावाखाली दहशतवाद पसरवणार्यांचा निषेध केला. दहशतवाद्यांच्या बंदुका नाही तर शिक्षणामुळेच संपूर्ण जगाचा विकास होणार आहे. शिक्षण घेऊ इच्छीत असलेल्या प्रत्येक मुलीचा मी आवाज होईल, असेही मलाला म्हणाली. तालिबान्यांनी स्वात खोर्यातील 400 शाळा उद्धवस्त केल्या. मात्र मी मागे राहाणार नाही. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पाकिस्तानाच नव्हे तर संपूर्ण जगात काम करण्याची माजी इच्छा आहे. मुलींच्या शिक्षणाला विरोध करणार्यांविरोधात मेहमी लढत राहीन, असेही मलालाने यावेळी सांगितले.
उल्लेखनिय म्हणजे, भारतीय कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसूफझई यांना संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जाणार आहे. मलाला अवघ्या 17 वर्षांची आहे.
यावेळी प्रसिद्ध सरोदवादक अमजद अली खान यांनी एका विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण केले.अमान अली आणि अयान अली या दोघांनी त्यांना मदत केली. पाकिस्तानचे सूफी गायक राहत फतेह अली यांनीही यावेळी प्रस्तुती दिली.
या पुरस्कार सोहळ्यासाठी सत्याथी पत्नी सुमेधा, मुलगा, सून आणि मुलगी ओस्लो येथे सुरु असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच मलालाचे आई-वडील देखील उपस्थित आहेत.
नोबेल पुरस्कारांना सुरुवात होऊन आज तब्बल 113 वर्षे उलटल्या असून पहिल्यांदाच एखाद्या भारतीयाची शांततेच्या नोबेलसाठी निवड झाली आहे. ‘बचपन बचाओ आंदोलना’च्या माध्यमातून सातत्याने 34 वर्षे संघर्ष करत असलेले सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांना हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. यापूर्वी मदर तेरेसा यांना 1979 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कैलास सत्यार्थी आणि मलाला युसूफझई यांच्याविषयी... बघा पुरस्कार सोहळ्याचे फोटो...वाचा आतापर्यंत कोणाकोणाला मिळाला आहे शांततेसाठीचा नोबेल...