आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराचीच्या काळ्या अर्थव्यवस्थेचे रोजचे उत्पन्न 83 कोटी रुपये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमध्ये गुन्हेगारी टोळ्या चालवत असलेल्या काळ्या अर्थव्यवस्थेतून रोज 83 कोटी रुपयांची कमाई करत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.


धमक्या देऊन बळजबरी वसुली, अपहरण करून खंडणी, वाटमारी, बेकायदेशीर पार्किंग आणि टप-या, अनधिकृत वीज जोडणी हे कराचीच्या काळ्या अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. कराचीच्या विविध भागांतून दररोज 1 कोटी रुपयांची बळजबरीने हप्तेवसुली केली जाते, तर अपहरण करून दररोज पाच कोटींच्या आसपास रक्कम गुन्हेगार खिशात घालतात, असे जीओ वृत्तवाहिनीने दिलेल्या विशेष वृत्तांत म्हटले आहे. कराची शहरात 500 हून अधिक बेकायदेशीर आणि अनधिकृत पार्किंगच्या जागा आहेत. पार्किंग शुल्कापोटी या ठिकाणांहून दररोज 2 लाख 40 हजार रुपये वसूल केले जातात. हॉकर्स आणि विक्रेते पोलिस, गुन्हेगार आणि कंत्राटदारांना दररोज 80 लाख 25 हजार रुपये देतात. कराची शहरात 55000 हॉकर्स आणि किरकोळ विक्रेते आहेत. कराची शहरातील पाणी माफिया दररोज 272 दशलक्ष गॅलन पाण्याची बेकायदेशीर विक्री करतात. त्यातून ते दिवसाकाठी 1 कोटी रुपयांची कमाई करतात. कराची शहरात अमली पदार्थ विक्री आणि सट्ट्याचे 15000 अड्डे आहेत. या अड्ड्यांवर दररोज 1 कोटी 50 लाख रुपयांची रग्गड कमाई केली जाते. भूमाफियांनी 30,000 एकर सरकारी जमीन बळकावली आहे.


दररोज 1 कोटीची वीजचोरी
पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर अशी ख्याती असलेल्या कराची शहरात 4000 ते 5000 अनधिकृत वीज जोडण्या आहेत. त्यासाठी दररोज 1 कोटी 50 हजार रुपये किमतीच्या विजेची चोरी करण्यात येते. शहरातून वाहने चोरी होण्याचे प्रमाणही खूप मोठे आहे. दररोज 40 ते 50 मोटारसायकली, 20 ते 25 कारची चोरी होते. त्याची सरासरी किंमत 2 कोटी 50 हजार रुपयांच्या घरात जाते.


दररोजची काळी माया
01 कोटी
हप्ता वसुली
2.40 लाख
अनधिकृत पार्किंग
80.25 लाख
हॉकर्सकडून वसुली
01 कोटी
बेकायदा पाणी विक्री
1.50 कोटी
सट्टा व अमली
पदार्थ विक्री
1.50 कोटी
वीजचोरी
1.43 कोटी
रिक्षा, टॅक्सी, बसेसकडून वसुली
2.10 कोटी
पोलिसांची लाचखोरी
03 कोटी
अपहरणातून
खंडणी वसुली