आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धाची आखणी व माहिती पाकिस्तानमधील फक्त चौघांनाच माहिती होती. माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्त्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आले होते व त्याबाबतची फुसटशी कल्पना पंतप्रधान नवाझ शरीफ यांना होती, असा गौप्यस्फोट माजी निवृत्त लष्कर अधिकारी शाहीद अजिज यांनी केला आहे.
शाहीद अजिज यांनी दोन दिवसापूर्वी १९९९ चे कारगील युद्ध पाकिस्ताननेच घडवून आणल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट एका लेखात केला होता. तसेच कारगील ऑपरेशन हे फक्त चार लोकांनीच आखलेले ऑपरेशन होते. याबाबत इतर सैनिकांना व लष्कराला याची माहिती नव्हती. या चौघात परवेझ मुशर्रफ, जनरल लेफ्टनंट मोहमंद अजिज, फोर्स कमांडमधील उत्तरीय प्रांताचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जावेद हुसैन, लष्करी तुकडीचे कमांडर महमूद अहमद या चौघडीलाच याबाबत माहिती होती.
तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारगील ऑपरेशनची माहिती दिली नव्हती. मात्र ते याबाबत पूर्ण अंधारात होते असेही नाही. याबाबतचा खुलासा करताना अजित यांनी म्हटले आहे की, शरीफ यांना माहिती नव्हते. मात्र त्याचकाळात शरीफ यांनी एका लष्करी अधिका-याला गप्पांच्या ओघात विचारले होते की, तुम्ही काश्मीर आम्हाला कधी मिळवून देणार आहात?. त्यावरुन कळून येते की, नवाझ शरीफ यांना कारगील ऑपरेशनची पुसटशी कल्पना होती.
मात्र, हे ऑपरेशन फसले व या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचे किती नुकसान झाले याचा अद्याप तपशील व अंदाज जाहीर झाला नसल्याचेही अजिज यांनी स्पष्ट केले. हे ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतेही नियोजन नव्हते. कोणत्या लोकांना कोणती जबाबदारी दिली आहे व द्यायची आहे याबाबत सुसंवाद नव्हता. आजही लष्कराला या ऑपरेशनमध्ये किती सैनिक मारले गेले याची माहिती नाही, यावरुन याचा सावळा गोंधळ कळून येतो, असेही अजिज यांनी स्पष्ट केले.
भारताने या ऑपरेशन जिंकले असले तरी, त्यांच्या गुप्तचर संघटनाच्या अपयशामुळेच पाकिस्तानने ही उंच अशा काश्मीरवर चढाई केली. कारगील ऑपरेशन पाक लष्कराने केले की मुजाहिद्दीन यासारख्या दहशतवादी संघटनेने हे भारताला शेवटपर्यंत कळले नाही, अशीही पुष्टी अजिज यांनी जोडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.