आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भनिरोधक गोळी बनवणारे जेरासी होते लेखकदेखील...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( फोटो- लेटी कॉटिन पोग्रेबिन)
कार्लजेरासी यांनी गर्भनिरोधक गोळीचा शोध लावण्यात निर्णायक भूमिका निभावली, मात्र आपल्याला त्यासाठी माजी अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या पत्नी एलीनॉर रुझवेल्ट यांचेही आभार मानले पाहिजेत. ऑस्ट्रियन यहुदी जेरासी वयाच्या १६ व्या वर्षी अमेरिकेत आले. काही काळानंतर त्यांनी रुझवेल्ट यांना मदतीसाठी पत्र लिहिले. त्यांच्या मदतीने शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. अशा तऱ्हेने वैज्ञानिक आविष्काराच्या वाटेवर त्यांचा प्रवास सुरू झाला.
वयाच्या ९१ व्या वर्षी ३० जानेवारीला त्यांचे निधन झाले. ते विद्वान प्राध्यापक, कुशल केमिस्ट जीववैद्यक उद्योजक होते. त्यांनी पर्यावरणाला अनुकूल कीटनाशकांच्या विकासास त्यांचे नावे आहेत. त्यांनी कविता, नाटक कादंबरीही लिहिली. तरीही महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या गर्भनिरोधक गोळीच्या शोधासाठीच लक्षात ठेवले जाईल.