आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karunanidhi News In Marathi, Tamil Resolution In UN

श्रीलंकाविरोधी मतदानात भारताची अनुपस्थिती माणुसकीला काळीमा फासणारी, करुणानिधींचा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- संयुक्त राष्ट्रसंघात घेण्यात आलेल्या श्रीलंकाविरोधी मतदानात भारताने अनुपस्थित राहणे हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे, असा जबरदस्त प्रहार द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी केला आहे.
यासंदर्भात करुणानिधी म्हणाले, की भारताने अनुपस्थित राहणे म्हणजे आईने आपल्या पोटच्या पोराचा गळा आवळून खून करण्यासारखे आहे. या घटनेमुळे आमच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू उभे राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे भारताने आमचे शीर शरमेने खाली झुकविले आहे. भारताच्या भूमिकेमुळे केवळ तामिळनाडूतील नव्हे तर जगभरातील तामिळ बांधवांना अतिव दुःख झाले आहे. अमेरिकेचा श्रीलंकेसोबत थेट संबंध नसला तरी अमेरिकेने हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या पटलावर ठेवला होता. आम्हाला अमेरिकेचे कौतुक वाटते.
श्रीलंकेत गेल्या दोन दशकांमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारात श्रीलंकेच्या लष्कराने जनतेवर केलेल्या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. काल झालेल्या मतदानात प्रस्तावाच्या बाजूने 23 तर प्रस्तावाच्या विरोधात 12 मते पडली आणि 12 देश अनुपस्थित राहिले.