इस्लामाबाद - काश्मीर व गुजरातचा बदला घेतला जाईल, असा इशारा पाकिस्तानी तालिबानच्या गटाने पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना दिला आहे. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान जमात अहरार असे गटाचे नाव आहे. याच संघटनेने वाघा सीमेवरील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
संघटनेचा म्होरक्या एहसान उल्लाह एहसानने ट्विट व माध्यमांना फोन करून धमकी दिली. "तुम्ही शेकडो मुस्लिमांचे मारेकरी आहात. गुजरात व काश्मीरमध्ये झालेल्या शिरकाणाची तुम्हाला किंमत चुकवावी लागेल', असे त्यात म्हटले आहे.