आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्‍या राजघराण्‍यात गोंडस राजपुत्राचे आगमन, देशभर जल्‍लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनः जगभरातील प्रसारमाध्‍यमांचे लक्ष असलेल्‍या ब्रिटनच्‍या राजघराण्‍यात अखेर तान्‍हुल्‍याचे आगमन झाले. युवराज्ञी केट मिडलटनने एका गोंडस मुलाला जन्‍म दिला. स्‍थानिक वेळेनुसार सायंकाळी 4.24 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 1 वाजता) केट मिडलटनची प्रसुती झाली. बाळाची प्रकृती ठणठणीत असून त्‍याचे वजन 3.8 किलोग्रॅम असल्‍याचे केनसिंग्‍टन पॅलेसतर्फे देण्‍यात आलेल्‍या निवेदनातून सांगण्‍यात आले आहे. राजपुत्राच्‍या आगमनाची बातमी कळताच देशभरात जल्‍लोष करण्‍यात आला.

केट मिडलटनला प्रसव वेदना सुरु झाल्‍यानंतर सकाळी 6 वाजता रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. त्‍यानंतर सुमारे 10 तासांनी तिने बाळाला जन्‍म दिला. तिची प्रसुती नॉरमल झाल्‍याची माहिती आहे. याबाबत सविस्‍तर माहिती अद्याप देण्‍यात आलेली नाही. परंतु, बाळ-बाळंतीण सुखरुप असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.