आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टीव्ह जॉब्जच्या बायोपिकमध्ये केट ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य महिला पात्र साकारण्याची संधी केट विन्सलेटला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. ऑस्कर विजेती केट आणि निर्मात्यांमध्ये यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन डॅनी बॉयल करणार आहेत. मायकल फॅडाबेंडन, सेठ रॉगन यांच्याही त्यात भूमिका असतील. स्कॉट रुडीन, मार्क गार्डन आणि गायमन कॅसडी चित्रपटाचे निर्माते आहेत. विशिष्ट भूमिकेसाठी नतालिया पोर्टमनशीही चर्चा सुरू होती. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित होईल.