आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kate Middleton Admitted In Hospital To Have Royal Baby

थोड्याच वेळात येणार \'रॉयल बेबी\' ! वाचा, कुठे होत आहे केटची प्रसुती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला होणार्‍या अपत्याची प्रतीक्षा संपत आली आहे. राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे, की केट मिडलटनला सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रिन्स चार्ल्सची पत्नी कॅमिलाने डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले, की लवकरच बाळाचा जन्म होऊ शकतो.

सुत्रांच्या माहितीनुसार हॉस्पिटलच्या लिंडो विंगमध्ये दाखल असलेल्या केटला नॉर्मल डिलिव्हरीची अपेक्षा आहे. अद्याप सर्वकाही सुरळीत आहे. केट मिडलटनवर लक्ष्य ठेवून असलेल्या डॉक्टरांच्या टीममध्ये शाही परिवाराशी संबंध असलेले स्त्रीरोग तज्ज्ञ मार्कस सेशल आणि एलेन फार्दिंग यांचा समावेश आहे.

यावेळी जगभरातील मीडिया सेंट्रल लंडनमधील सेंट मेरीज हॉस्पिटलबाहेर तळ ठोकून आहे. प्रिन्स विल्यमचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला होता, त्याच हॉस्पटलमध्ये राजघराण्याचा नवीन सदस्यही जन्म घेणार असल्याचे वृत्त सीएनएनने दिले आणि 25 जूनपासूनच मीडिया हॉस्पिटलबाहेर डेरे दाखल झाला आहे.