आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kate Midelton Is Going To Give Birth To A Baby Girl

ब्रिटिश राजघराण्‍यात येणार 'राजकन्‍या'?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनच्‍या राजघराण्‍यात लवकरच एक बाळ येणार आहे. त्‍याच्‍याबद्दल प्रचंड उत्‍सुकता आहे. त्‍यातच राजघराण्‍यात मुलीचाच जन्‍म होणार असल्‍याची जोरदार चर्चा ब्रिटनमध्‍ये रंगली आहे. प्रिंस विलियम्‍स आणि केट मिडलटन यांना मुलगी होणार असल्‍याचे वृत्त काही प्रसारमाध्‍यमांनी दिले आहे.

या वृत्तानुसार, स्‍वतः केट मिडलटननेच याबाबत संकेत दिले आहे. बाळाला भेटवस्‍तू देणा-यांचे तिने आभार मानले. परंतु, आभार मानताना ती याबाबत बोलून गेली. केटने आतापर्यंत स्‍वतःच्‍या खासगी आयुष्‍याबाबत प्रचंड काळजी घेतली आहे. मात्र, यावेळी तिच्‍या हातून चूक झाली. त्‍यावरुन प्रसारमाध्‍यमांनी चर्चा रंगविल्‍या. तिच्‍या संकेतांचा अर्थ लावून राजघराण्‍यात कन्‍यारत्न जन्‍माला येणार आहे, असे प्रसारमाध्‍यमे बोलू लागली आहेत.